पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pushpa Hegde from Pune elected Vice President of International Women Council pune

पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

पुणे : पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषद अर्थात इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वूमन (आयसीडब्ल्यू) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. हेगडे या सर्वाधिक मतांनी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या पहिल्या आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्या संघटनेत कार्यरत असून याआधी त्यांनी आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे. आयसीडब्ल्यू ही १३० वर्षे जुनी संघटना असून, ती ६७ देशांशी संलग्न आहे.

या संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे असून, आरोग्य, जनकल्याण, शांतता, समानता, शिक्षण, पर्यावरण, स्थलांतर, हिंसाचार, भेदभाव, महिला, मुले, निर्वासित आणि अल्पसंख्याक नागरिकांचे अधिकार या मुद्द्यांवर ही संघटना संयुक्त राष्ट्र संघासमवेत काम करते. हेगडे यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. पुण्यातील राखी शेट्टी यांची आयसीडब्ल्यूच्या स्थायी समितीमध्ये सामान्य कल्याण समन्वयक म्हणून, तर सिमला येथील नीता आक्रे यांची ग्रामीण आणि शहरी सल्लागार म्हणून निवड झाली आहे.

Web Title: Pushpa Hegde From Pune Elected Vice President Of International Women Council Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top