पीवायसी बॅडमिंटन लीग

पीवायसी बॅडमिंटन लीग
Published on

पीवायसी क्लब ः बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या पीवायसी बॅडमिंटन लीगमध्ये इम्पिरिअल स्वान्स विरुद्धच्या लढतीत एरियल स्विफ्टस संघाचा अमित देवधर शटल परतविताना. शेजारी सोहम कांगो.
---------------

रेव्हन्स, कॉमेट्स संघांची आगेकूच कायम
पीवायसी बॅडमिंटन लीग ः फाल्कन ऑप्टिमा आणि एरियल स्विफ्टस संघांचे विजय

पुणे, ता. ८ ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित बाराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन लीगमध्ये नाडगोंडे रेव्हन्स आणी जोग कॉमेट्स या संघांनी सलग दुसऱ्या विजयासह आपली आगेकूच कायम राखली आहे. अन्य लढतीत फाल्कन ऑप्टिमा आणी एरियल स्विफ्टस या संघानी विजय मिळविले.
पीवायसी क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या वरिष्ठ विभागाच्या ‘ब’ गटात पराग चोपडा, कपिल बाफना, नितीन कोनकर, अनिल आगाशे, विवेक लिमये, संदीप साठे, प्रथम पारेख, रोनित जोशीच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर जोग कॉमेट्स संघाने हॉक्स संघाचा चुरशीच्या लढतीत ४-३ असा निसटता पराभव करून दुसरा विजय मिळविला. या वेळी पराभूत संघाकडून अनिश राणे, कृष्णनील गोरे, अनुज मेहता, सिद्धांत खिंवसरा, जनक वाकणकर व राधिका इंगळहळीकरने केलेली खेळी अपुरी ठरली.
दुसऱ्या सामन्यात नीरज दांडेकर, प्रीती फडके, सचिन जोशी, सुमीत नेरकर, वरुण निवर्गी, सारंग आठवले, अनिरुद्ध आपटे, अन्वित राजवाडेच्या जोरदार खेळाच्या जोरावर फाल्कन ऑप्टिमा संघाने कारा इंटलेक्ट कियाज संघाचाही चुरशीच्या लढतीत ४-३ असा पराभव केला. या वेळी पराभूत संघाकडून सिद्धार्थ निवसकर, बिपिन देव, रणजित पांडे, गौतम लोणकर, आरुषी पांडे व आकाश सूर्यवंशीने केलेली खेळी अपुरी ठरली.
‘अ’ गटात नाडगोंडे रेव्हन्स संघाने सेइनुमेरो रॉकेट्स संघाचा चुरशीच्या लढतीत ४-३ असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. या वेळी विजयी संघाकडून प्रतीक धर्माधिकारी, केदार नाडगोंडे, अविनाश दोशी, चंद्रशेखर आपटे, चिन्मय चिरपुटकर, पृथ्वी शहा, रिआन करंदीकर, सारा नवरेने सुरेख खेळी केली, तर पराभूत संघाकडून अनिकेत सहस्रबुद्धे, वरुण साहू, आशुतोष सोमण व मंदार विंझे, रोहित मेहेंदळे, समीर जोगने दिलेली लढत अपुरी पडली.
अखेरच्या सामन्यात एरियल स्विफ्टस संघाने इम्पिरिअल स्वान्स संघाचा ४-३ असा पराभव केला. या वेळी एरियल स्विफ्टस संघाकडून सोहम कांगो, अमित देवधर, सिद्धार्थ साठ्ये, हेमंत करमरकर, तुषार नगरकर, रोहन जोशी, सोहम गाडगीळ, रोहिन लागू यांनी अफलातून खेळी केली.
तर पराभूत संघाकडून देवेंद्र राठी, निखिल भाटे, ईशान पारेख, रोहन पै, ईशा साठे व आदित्य काळेने दिलेली लढत अपुरी पडली.
-----------
पीवायसी बॅडमिंटन जोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com