पीवायसी स्नूकर अँण्ड बिलियर्डस लीग

पीवायसी स्नूकर अँण्ड बिलियर्डस लीग
Published on

पीवायसी क्लब ः स्नूकर अँड बिलियर्ड्‍स हॉलमध्ये सुरू झालेल्या पीवायसी स्नूकर ॲण्ड बिलियर्डस लीगमध्ये स्कायलाइन स्ट्रायकर्स संघाचा स्वरूप कुलकर्णी लक्ष्य साधताना.
--------------

सुप्रिम एसेस, स्कायलाइन स्ट्रायकर्स संघांची विजयी सलामी

पुणे, ता. १७ ः पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तिसऱ्या पीवायसी स्नूकर ॲण्ड बिलियर्ड्‍स लीगमध्ये सुप्रिम एसेस आणि स्कायलाइन स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धींना हरवून विजयी सलामी दिली.
पीवायसी क्लबच्या स्नूकर ॲण्ड बिलियर्डस हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत सुप्रिम एसेस संघाने टी पी रॉकेट्स संघाचा ५-२ असा पराभव केला. या वेळी विजयी संघाकडून निमिष कुलकर्णी, कर्णा मेहता, श्री शिरोडकर, रोहित सुगंधी, अरुण बर्वे, प्रकाश वाळंबेने सुरेख कामगिरी बजावली.
दुसऱ्या लढतीत आदित्य देशमुख, दिग्विजय गोरे, अनिकेत शिंदे, स्वरूप कुलकर्णी, अमित भडभडे, विशाल भुरट, आनंद आपटेच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर स्कायलाइन स्ट्रायकर्स संघाने क्यू मास्टर्स संघाला ५-२ असे हरविले.
या स्पर्धेचे उद्‍घाटन पीवायसी क्लबचे सहसचिव सारंग लागू यांच्या हस्ते झाले. या वेळी क्लबच्या स्नूकर व बिलियर्ड्स विभागाचे सचिव नंदन डोंगरे, अविनाश रानडे, शिरीष साठे, रणजित पांडे उपस्थित होते.
निकाल असे :
१) सुप्रिम एसेस विजयी विरुद्ध टी पी रॉकेट्स संघ ५-२. १५ रेड स्नूकर एकेरी : निमिष कुलकर्णी वि.वि. सुचरित राजाध्यक्ष १०२-४६; ६ रेड दुहेरी : संजीव पटेल व हर्षद शहा पराभूत विरुद्ध संजय बामणे व रणजित पांडे २०-४८; बिलियर्ड्स : अशोक शेट्टी पराभूत विरुद्ध विशाल मल्होत्रा ७०-१०२; ६ रेड स्नूकर एकेरी : कर्णा मेहता वि.वि. केदार लुकतुके ७७-३९; ६ रेड स्नूकर दुहेरी : श्री शिरोडकर व रोहित सुगंधी वि.वि. तुषार मेंगाळे व मेघ तायडे ६४-५४; ब्लॅक बॉल शूट आउट : अरुण बर्वे वि.वि. समीर सावला ३-२; ब्लू बॉल शूट आउट : प्रकाश वाळंबे वि.वि. प्रशांत कुलकर्णी २-०.
२) स्कायलाइन स्ट्रायकर्स विजयी विरुद्ध क्यू मास्टर्स ५-२. १५ रेड स्नूकर एकेरी : आदित्य देशमुख वि.वि. योगेश लोहिया ६४-५०; ६ रेड दुहेरी : दिग्विजय गोरे व अनिकेत शिंदे वि.वि. अमीर आजगावकर व शिरीष साठे ५४-४६; बिलियर्ड्स : स्वरूप कुलकर्णी वि.वि. निशाद चौघुले १००-८८; ६ रेड स्नूकर एकेरी : संजीव आगाशे पराभूत विरुद्ध गिरीश दामले २५-४७; ६ रेड स्नूकर दुहेरी : अमित भडभडे व विशाल भुरट वि.वि. दीपक सबनीस व राहुल मुंदडा ५४-४४; ब्लॅक बॉल शूट आउट : आनंद आपटे वि.वि. सौमित्र रानडे ३-१; ब्लू बॉल शूट आउट : देवव्रत राक्षे पराभूत विरुद्ध क्षितिज लोहिया १-३.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com