

पिंपरी, ता. १६ : ‘‘उत्पादन क्षेत्रापासून सेवा क्षेत्रापर्यंत गुणवत्ता, उत्पादकता आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी क्वालिटी सर्कल हे एक प्रभावी माध्यम आहे,’’ असा सूर अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.
‘गुणवत्ता’ या संकल्पनेवरील क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे विभागीय ४१ वे वार्षिक अधिवेशन नुकतेच भोसरी येथे पार पडले. याचे उद्घाटन दाना आनंद इंडिया प्रा. लि. चे बिझनेस विभागाचे प्रमुख बालाजी माळी यांनी केले. फोरमच्या पुणे चॅप्टरतर्फे याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राज्यातील शंभरहून अधिक औद्योगिक संस्थांनी सहभाग घेतला. दोनदिवसीय महोत्सवात ३०० हून अधिक केस स्टडीज, ५७ घोषवाक्य आणि ६३ पोस्टर स्पर्धकांनी सादर केले. यात कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्या, त्यावरील उपाययोजना आणि त्यातून मिळालेले फायदे यांचे प्रभावी सादरीकरण केले. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे आयकॉन हॉस्पिटलचे संचालक अध्यक्ष डॉ. प्रताप सोमवंशी, पिंपरी चिंचवड होमिओपॅथी असोसिएशनचे माजी शहराध्यक्ष डॉ. संदीप लुणावत, फोरमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा व संचालिका डॉ. रजनी इंदुलकर, फोरमचे पदाधिकारी प्रकाश यार्दी, धनंजय वाघोलीकर, अनंत क्षीरसागर, माधव बोरवणकर, परवीन तरफदार, खजिनदार संजीव शिंदे, व्यवस्थापक चंद्रशेखर रुमाले उपस्थित होते. स्पर्धांचे परीक्षण ३८ जणांनी केले. तर, एकूण तेराशेहून अधिकांनी अधिवेशनात सहभाग नोंदवला.
प्रस्तावना माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे यांनी केली. सूत्रसंचलन विजया रुमाले आणि संजीव शिंदे यांनी, तर डॉ. रजनी इंदुलकर यांनी आभार मानले.
PNE26W59141
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.