hadpasar.jpg
hadpasar.jpg

पुण्यातील 'या' भागात उभारण्यात आलंय क्वारंटाइन सेंटर

हडपसर (पुणे) : गोंधळेनगर येथील कै. रामचंद्र बनकर क्रीडा संकुलामध्ये कोरोना संशयितांची तपासणी करणे सोईचे व्हावे, यासाठी स्वॅब कलेक्शन सेंटर तसेच संशयित रूग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरु करण्यात आले आहे. याचे आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी कोरोना हा बरा होणारा आजार आहे, त्यामुळे कोरोना या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेणे व प्रतिबंधात्मक बाबी पाळणे गरजेचे आहे. तसेच सर्दी खोकला, ताप आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्यासारख्या समस्या होत असतील तर तातडीने डॅाक्टरांचा सल्ला घ्या, असे मत आमदार तुपे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, यावेळी नगरसेविका वैशाली बनकर म्हणाल्या, हडपसर भागातील नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी व संशयित रूग्णांचे विलगीकरण करण्यासाठी खराडी किंवा येवलेवाडी येथे जावे लागत होते. रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पाठपुरावा करून स्वॅब कलेक्शन सेंटर व विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी १९५ रूग्णांसाठीची व्यवस्था असून रोज ३०० स्वॅब टेस्टींग करण्यात येणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याप्रसंगी योगेश ससाणे, प्रभाग समिती अध्यक्षा पूजा कोंद्रे, माजी नगरसेवक सुनिल बनकर, डॅा. शंतनू जगदाळे, सागरराजे भोसले, सहाय्यक महापालिका आयुक्त वैभव कडलक, डॅा. स्नेहल काळे, विजय मोरे, अविनाश काळे, मनोज घुले, राहूल होले, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक संजय धनवट उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com