कारशेडच्या जागेचा प्रश्‍न मार्गी; मेट्रो प्रकल्पासाठी ताथवडेतील 15 हेक्टर जागा

कारशेडच्या जागेचा प्रश्‍न मार्गी; मेट्रो प्रकल्पासाठी ताथवडेतील 15 हेक्टर जागा

पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डसाठी ताथवडेतील सुमारे 15 हेक्टर जागा तीन वर्षांच्या भाडेकराराने देण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्‍यक कारशेडच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान इलेव्हेटड मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी आवश्‍यक त्या जागा ताब्यात नसल्यामुळे या प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच घेतला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्या बैठकीत हिंजवडी येथील कारशेडच्या जागेसह शासकीय जागांचे ताब्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये ताथवडे येथे कास्टिंग यार्डसाठी 15 हेक्टर जागा भाडेकरारने द्यावी, अशी मागणी यापूर्वीच पीएमआरडीएने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यावरही चर्चा झाली. गेल्या वर्षभराहून अधिक त्यावर निर्णय झाला नव्हता. 

दरम्यान, काल जिल्हा प्रशासनाकडून पीएमआरडीएला ही परवानगी देण्यात आली आहे. ताथवडेती 15 हेक्टर जागा तीन वर्षांच्या भाडेकराराने पीएमआरडीए मेट्रा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या कास्टिंग यार्डच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com