
कोथरुड (पुणे) : कोथरुडमध्ये दारु विकत घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी रांग लागलेली दिसली. सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे या सर्वाचा विसर अनेकांना पडला होता. मोठ्या पिशव्या, वाहने घेवून लोक दारु खरेदीसाठी आले होते. ग्राहकांची गर्दी पाहून दारु विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती. एक बाटली ते एक खोके अशा प्रमाणात दारु घेवून जाणारे दिसत होते.
कोथरुड डेपो परिसरात असलेल्या दुकानासाठी दोन दिशेने दोन रांगा लावल्या होत्या. रांगेच्या बाजूला रेंगाळणारांना दुकानदारांचे कामगार दूर दूर थांबा असे सांगत होते. परंतु, लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांची गाडी आल्यावर तात्पुरती सुधारणा झाली. पोलिसांनी दुकानदाराला ग्राहकांना शिस्त लावण्याविषयी गाडीत बसूनच माईकवरुन सांगितले. पोलिसांची गाडी निघून गेल्यावर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
सामाजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे म्हणाले, "दारुसाठी दहा ते सहा ही वेळ देण्यात आली आहे. मात्र, भाजी विक्रेत्यांसाठी फक्त 10 ते 12 या वेळेचे बंधन घातले आहे. शेतकरी, छोट्या व्यावसायिकांना कडक बंधने आणि दारु विक्रेत्यांना मुभा हा काय न्याय आहे. दारु विक्रेते म्हणजे देशभक्त, दारु म्हणजे जीवनावश्यक व भाजी म्हणजे चैनीची बाब झाल्यासारखे वाटत आहे.'
याबाबत लक्ष्मण चव्हाण म्हणाले, "दारुसाठी आलेल्या लोकांनी आरोग्य विषयक काळजी न घेतल्यामुळे जर कोथरुडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले तर त्याला जबाबदार कोणाला धरायचे. कोथरुडकरांनी एवढ्या दिवस पाळलेल्या संयमाला पायदळी तुडवल्यासारखे हे झाले. हा शिस्तीने राहणा-या कोथरुडकरांचा अपमान आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.