उपळाई गटात राऊतांचेच वर्चस्व

उपळाई गटात राऊतांचेच वर्चस्व
Published on

लोगो : उपळाई जि.प. गट
---
BAR26B12988
दीपक वैद्य
---
‘करेक्ट’ रणनीतीने राउतांची विजयी खेळी
नाराजांची समजूत, गावागावांतील संपर्क अन्‌ विकासकामांचा प्रभाव
उमेश पवार : सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. १२ : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर न खचता माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दुसऱ्याच दिवसापासून संघटनबांधणी आणि नियोजनबद्ध कामाला सुरवात केली. पराभवाची कारणे शोधून, करेक्ट रणनीती अवलंबून, उपाययोजना राबविल्याचा परिणाम पुढील सर्व निवडणुकांत स्पष्टपणे दिसून आला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बार्शी तालुक्यासह विविध गट अन्‌ गणांतही विक्रमादित्याचा शिक्का मारला. नियोजबद्ध रणनीतीने त्यांनी उपळाई गटातही मोठे यश मिळवले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत राऊत यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत सहकार क्षेत्रात दमदार एंट्री केली. नगर परिषद निवडणुकीत सुरवातीला पोषक वातावरण नसतानाही त्यांनी ‘डॅमेज कंट्रोल’ करत नाराजांची समजूत काढली आणि सर्व घटकांना न्याय देत नगराध्यक्षपदासह सत्ता मिळवली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी गावागावांत नियोजनबद्ध प्रचार मोहीम राबविली. उपळाई गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुक होते; मात्र सर्वसामान्य कुटुंबातील तरुण दीपक वैद्य यांना उमेदवारी देत राऊत यांनी धाडसी निर्णय घेतला. ‘गैरसमज दूर ठेवून माझ्यासाठी काम करा’ असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उपळाई ठोंगे येथे विरोधी उमेदवार त्याच गावातील असतानाही दीपक वैद्य यांनी तब्बल साडेनऊ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. उपळाई, खांडवी, आगळगाव, काटेगावसह कांदलगाव, गाडेगाव, देवगाव (मांजरे), कळंबवाडी, चारे, चुंब, कोरेगाव, खडकोणी, भानसळे, बाभूळगाव या गावांतील सातत्यपूर्ण संपर्क आणि विकासकामांचा मोठा प्रभाव पडल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात उपसा सिंचनाचे पाणी आणण्याचे आश्वासन, डांबरी व सिमेंट रस्त्यांची कामे यामुळे राऊत यांना मोठे मताधिक्य मिळाले. विरोधी सोपल गटातील काही कार्यकर्त्यांनीही राऊत गटात प्रवेश केल्याने विजय अधिक सुकर झाल्याचे दिसून येते.
---
चौकट
उपळाईला सभापतिपद मिळणार?
पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने उपळाई गणातील मीनाक्षी रोंगे यांचे नाव चर्चेत आहे. बाजार समिती सभापतिपद पूर्वेकडील पांगरी भागाला मिळाल्यानंतर आता पश्चिम भागाला न्याय देत राऊत उपळाई गटाला संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com