सातारा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी पीक विम्यात सहभागी व्हा

सातारा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी पीक विम्यात सहभागी व्हा
Published on: 

‘रब्बी पीक विम्यात सहभागी व्हा’

ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, भुईमुगाचा समावेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : रब्बी हंगाम २०२६ साठी जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
--- चौकट ---
अर्जाची मुदत
पीक---- मुदत
ज्वारी : ३० नोव्हेंबर
गहू, हरभरा, कांदा : १५ डिसेंबर
उन्हाळी भुईमूग : ३१ मार्च २०२७
---------------
योजना सर्व पात्र, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी तसेच कुळांसाठी पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाची आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, खाते उतारा, ई-पीक पाहणी नोंद असलेला अद्ययावत ७/१२, फार्मर आयडी क्रमांक, बँक पासबुक आणि अधिकृत फोटो ओळखपत्र असणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून थेट अथवा वैयक्तिकरीत्या अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. विहित नमुन्यातील अर्ज बँका व विमा कंपनीकडे उपलब्ध आहेत.

पात्र शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी संबंधित राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक, पोस्ट कार्यालय, विमा प्रतिनिधी, सार्वजनिक सुविधा केंद्र अथवा संकेतस्थळावर मुदतीत विमा हप्ता जमा करावा. योजनेच्या सविस्तर माहिती व मार्गदर्शनासाठी गावातील कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी वेळेत विमा संरक्षण मिळवावे, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.