dog bite
sakal
महागाव - तालुक्यातील गुंजसह मोरथ, धारमोहा, माळकीन्ही, वाघनाथ आणि बोथा परिसरात सोमवारी सकाळपासून पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. मोकाट कुत्र्याने एकामागून एक नागरिकांना लक्ष्य करत किमान ३० जणांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पाच गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.