श्री राघवचैतन्य महाराज यात्रेस आजपासून प्रारंभ
फडतरवाडीत आजपासून
राघवचैतन्य महाराज यात्रा
पुसेगाव, ता. २४ : फडतरवाडी (नेर तलाव, ता. खटाव) येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गुरूपरंपरेतील संत राघवचैतन्य महाराजांच्या यात्रेस संजीवन समाधीचे भुयार श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते उघडून उद्यापासून (रविवार) प्रारंभ होईल. यात्रा एक फेब्रुवारीपर्यंत असून, या कालावधीत श्री राघव चैतन्य व पद्मावती देवस्थान ट्रस्टतर्फे धार्मिक व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
२५ ते ३१ जानेवारीअखेर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होईल. या पारायणामध्ये संत महात्म्यांच्या सुश्राव्य कीर्तन व भजनाचे कार्यक्रम होतील. शुक्रवार (ता. ३०) हा यात्रेचा मुख्य दिवस असून, यादिवशी दुपारी १२.१५ वाजता मान्यवरांच्या हस्ते रथपूजन होईल. त्यानंतर राघवचैतन्य महाराजांच्या प्रतिमेची रथातून भव्य मिरवणूक काढली जाईल. याचदिवशी यात्रा स्थळावर श्री राघवचैतन्य बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यात्रेत दिवाबत्ती, पिण्याचे पाणी, आरोग्य, संरक्षण या सोयी केलेल्या आहेत. नेर तलाव चैतन्य टेकडी परिसरात भाविकांच्या मनोरंजनासाठी आकर्षक पाळण्यांची, तसेच मेवामिठाई, सौंदर्यप्रसाधने, खेळणी आदी दुकानांची सोय केली आहे. यात्राप्रेमी, व्यापारी, शेतकरी, भाविक, वारकरी व पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती स्वानंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत फडतरे आणि विश्वस्तांनी केले आहे.
फोटो ओळ :
S26B01342
श्री राघवचैतन्य महाराज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

