

Raghvendra Mankar
esakal
स्वारगेट: पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी शुक्रवारी (ता. १६) जाहीर झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र मानकर हे २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. पुणे महापालिकेत १२० हून अधिक जागांवर भाजपाने विजय मिळवला असून शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याची कामगिरी मानकर यांनी केली आहे.