Raghunath Kuchik Rape Case : चित्रा वाघ यांच्यावर पीडित तरुणीचे गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh Raghunath Kuchik  Rape Case

कुचिक बलात्कार प्रकरण; चित्रा वाघ यांच्यावर तरुणीचे गंभीर आरोप

Raghunath Kuchik rape case Update

पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने मंगळवारी गौप्यस्फोट केलाय. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आपल्याला पोलिसांकडे विशिष्ट जबाब द्यायला भाग पाडलं, असा गंभीर आरोप तरुणीने केला असून मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे तरुणीने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. संबंधित तरुणीने 'साम टीव्ही'शी बोलताना चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.

पीडितेनं साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की, "आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवलं होतं. याशिवाय चित्रा वाघ यांनी पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला भाग पाडलं होतं" महंम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं असा गंभीर आरोपही पीडितेनं केला आहे.

चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे असून विशिष्ट यंत्रणा वापरुन माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असा दावाही पीडित तरुणीनं केला आहे. याशिवाय काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीनं एक पत्र मला आणून दिलं, हे पत्र पोलिसांना देण्यासाठी मला जबरदस्ती करण्यात येत आहे, असा आरोपही या तरूणीनं केला आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जातोय, असा आरोपही या पीडित तरूणीने केला आहे.

Web Title: Raghunath Kuchik Rape Case Serious Allegations Against Chitra Wagh By Victim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
go to top