
पुणे - 'मंगेशकर कुटुंबियांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळणे, हे एका संगीत साधकासाठी अतिशय मोलाचे आहे. त्यामुळे 'लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार' या पुरस्कारासाठी मी स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो. सर्वोत्तमाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा ध्यास प्रत्येक संगीत साधकाचा असतो, माझाही तोच प्रयत्न आहे", अशी भावना गायक राहुल देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केली.