भाजपवाल्यांनी जबरदस्तीने व्यापाऱ्यांची दुकाने बंद केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

भाजपवाल्यांनी जबरदस्तीने व्यापाऱ्यांची दुकाने बंद केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप
Published on: 

भाजपनेच दुकाने
जबरदस्तीने बंद केली

राहुल गांधी यांचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ : भाजपच्या लोकांनी कॅनॉट प्लेस येथील व्यापाऱ्यांची दुकाने जबरदस्तीने बंद केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सभेदरम्यान केला. आंदोलनात सामील होणाऱ्या लोकांनी व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन आम्ही केले होते. मात्र, भाजपवाल्यांनी दुकाने बंद केली. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचा दावा गांधी यांनी केला.
‘एसआयआर’ मोहीम रद्द करावी तसेच ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवले जाण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून रामलीला मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी तोंडावर असल्याने ही सभा नंतर घेतली जावी, असे आवाहन व्यापारी संघटनांकडून राहुल गांधी यांना करण्यात आले होते. तथापि, सभा पुढे ढकलण्यास गांधी यांनी नकार दिला होता. आमच्या मागण्या मान्य झाल्या तर ३० सेकंदांत आंदोलन बंद केले जाईल, असे उत्तर गांधी यांनी व्यापाऱ्यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर, भाजपच्या लोकांनी व्यापाऱ्यांची दुकाने बंद केल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान कोण आणि कसे करत आहे, ते पाहा, असे सांगत गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.