

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.१५ ः अंकिता भंडारीच्या आईवडिलांच्या न्यायाची आशा तुटू देऊ नका, अशी विनंती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज लिहिलेल्या पत्रात केली आहे. सिक्कीमच्या राज्यपालपदी भाजपचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्याची मागणीही त्यांनी केली.
‘‘मोदी सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा आणि तपास पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांना पदभार स्वीकारण्यापासून रोखावे. एकोणवीस वर्षांच्या अंकिता भंडारीने एका ‘व्हीआयपी’साठी स्वतःच्या प्रतिष्ठेशी तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे तिची हत्या करण्यात आली. चार वर्षे उलटून गेल्यानंतरही ‘सीबीआय’च्या संथ तपासामुळे तो ‘व्हीआयपी’ नेमका कोण होता, हा प्रश्न कायम आहे,’’ असे गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
दुष्यंत गौतम यांचा प्रकरणाशी संबंध असल्याचा अंकिताच्या कुटुंबासह अनेकांना संशय आहे. अशा परिस्थितीत त्यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती पाहून आपल्याला धक्का बसला आहे. राज्यपाल पदावर असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही फौजदारी कारवाई होऊ शकत नाही. दुष्यंत गौतम यांच्या नियुक्तीची शिफारस करून महिलांच्या सुरक्षेची मुळीच काळजी नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सिद्ध केले असल्याची टीका राहुल गांधी यांनी पत्रात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.