

राज्यातील प्रश्नांवर गांधी- चव्हाणांत चर्चा
नाशिकला बैठक; ज्वलंत प्रश्नावर आक्रमक होण्याचे संकेत
कऱ्हाड, ता. ५ ः लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौऱ्यात नाशिक येथे प्रदेश काँग्रेसच्या निवासी प्रशिक्षण शिबिराला भेट दिली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांशी विविध प्रश्नांचा आढावा घेत चर्चा केली. त्यात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी गांधी यांच्याशी सद्यःस्थितील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
बैठकीत महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया, शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, महिला व बालकांवरील गुन्ह्यांत होणारी वाढ, शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प व नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चातील अनियमितता व भ्रष्टाचार या विषयांवर सविस्तर विचार विनिमय करण्यात आला.
राज्यातील सामान्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर चर्चा झाली. या समस्यांबाबत काँग्रेसने अधिक प्रभावीपणे जनतेच्या बाजूने उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी गांधी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘काँग्रेस जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील आहे. विरोधी पक्ष म्हणून लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत राहील. शेतकरी, महिला, युवक आणि सामान्यांच्या न्याय मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल. जनतेच्या आवाजाला अधिक बळ देण्याचे काम करत राहील.’’
राज्यातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर झालेल्या चर्चेत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती गांधी यांच्या निदर्शनास आणून दिली. जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावी लढ्याची गरज अधोरेखित केली. काँग्रेस संघटना अधिक मजबूत करून राज्यातील जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
.............
चौकट
............
सक्रिय होण्याचे आवाहन
राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली. राज्यातील राजकीय, सामाजिक घडामोडींमध्ये त्यांचा अनुभव व मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.
W47338
नाशिक ः काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करताना राहुल गांधी.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.