राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून 
एआय परिषदेत आंदोलन ः भाजप

राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून एआय परिषदेत आंदोलन ः भाजप

Published on

राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून
एआय परिषदेत आंदोलन ः भाजप

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २४ ः ‘‘देशाला बदनाम करण्याचा उद्देश ठेवत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरून एआय परिषदेत ‘शर्टलेस’ आंदोलन केले.  त्यांच्याच सांगण्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते नंगानाच करत आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
‘‘देशाला अपमानित करण्याच्या प्रयत्नात गांधी यांचे स्वतःचे पितळ दिवसेंदिवस उघडे पडत आहे, भस्मासुर राहुल गांधी यांच्या  इशाऱ्यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते नंगानाच करतील, अशी कल्पनाही कधी महात्मा गांधी आणि भगत सिंह यांनी केली नसावी. काही दिवसांपूर्वी पर्यंत प्रेमाचे दुकान चालवण्याचे नाटक राहुल करत होते, मात्र या दुकानात निर्लज्जपणाचे साहित्य ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासारखा नेता विरोधी पक्षनेता बनणे हे अतिशय दुर्दैवी आहे,’’ असा आरोप भाटिया यांनी केला.
एआय परिषदेत जे काही झाले त्याबद्दल राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशवासीयांची माफी मागितली पाहिजे. राहुल यांचा राज्यघटनेवर विश्वास नसेल तर त्यांनी राजकारण करणे सोडले पाहिजे,’’ असेही भाटिया यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com