
पुणे : लोकसभा निवडणुकीतील मतचोरीचे पुरावे सादर केल्याने; तसेच तक्रारदार सात्यकी सावरकर हे महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांचे वंशज असल्याने आपल्या जिवाला धोका आहे, असा अर्ज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी बुधवारी येथील विशेष न्यायालयात केला.