Vidarbha Industrial Growth review: विदर्भ दौऱ्यात सार्वजनिक उपक्रम समितीकडून स्थानिक रोजगार, पारदर्शक कामकाज आणि औद्योगिक विकासाचा सखोल आढावा

विदर्भातील औद्योगिक, वन व पायाभूत प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी; स्थानिक रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पारदर्शक कामकाजावर समितीचा भर
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.

Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.

Sakal

Updated on

प्रकाश शेलार

खुटबाव : महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष तथा दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील समितीने गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या तीन जिल्ह्यांचा आपला महत्त्वपूर्ण अभ्यास दौरा नुकताच पूर्ण केला. विदर्भातील औद्योगिक विकास, वन व्यवस्थापन, कौशल्य विकास उपक्रम, पायाभूत सुविधा, सिंचन प्रकल्प आणि विविध शासकीय महामंडळांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com