राहुरीत आजी-माजी नगरसेवकांमध्ये श्रेयवाद रंगला

राहुरीत आजी-माजी नगरसेवकांमध्ये श्रेयवाद रंगला
Published on: 

राहुरीत रंगला श्रेयवाद


आजी-माजी नगरसेवकांचे एकमेकांवर आरोप


राहुरी, ता. २७ : राहुरी शहर हद्दीतील मल्हारवाडी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामावरून आजी-माजी नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. आमदार प्राजक्त तनपुरे समर्थक नगरसेवक सागर तनपुरे आणि विखे-कर्डिले समर्थक माजी नगरसेवक आर. आर. तनपुरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत रस्त्याचे काम आपणच मार्गी लावल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या श्रेयवादाची शहरात चर्चा सुरू असून, कामे मार्गी लागणे महत्त्वाचे असल्याची भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

माजी नगरसेवक आर. आर. तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आपण केलेल्या पत्रव्यवहारामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार अक्षय कर्डिले यांनी भूमिगत गटारीच्या ठेकेदाराला सूचना देऊन मल्हारवाडी रस्त्याचे काम सुरू केले. संबंधित प्रभागातील नगरसेवकाने आपल्या कामाचे श्रेय घेण्याऐवजी अंतर्गत रस्त्यांची व इतर प्रलंबित कामे करून दाखवावीत, असे आव्हानही त्यांनी दिले.

त्यावर नगरसेवक सागर तनपुरे यांनी प्रत्युत्तर दिले. आपण आणि नगरसेविका प्रियंका आहेर यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भूमिगत गटारीच्या ठेकेदाराकडून रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांना निष्क्रियतेमुळे जनतेने घरी बसविले, त्यांनी आमदार कर्डिलेंना दोन दिवसांपूर्वी दिलेल्या पत्रावर पंधरा दिवसांपूर्वीची तारीख टाकून जनतेची दिशाभूल करून आमच्या कामाचे श्रेय लाटू नये, असेही त्यांनी सुनावले. आजी-माजी नगरसेवकांतील या श्रेयवादाची नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. दोघांनीही श्रेय घ्यावे; मात्र त्याचबरोबर प्रभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com