राहुरी

राहुरी
Published on

RHF26B11100
राहुरी : इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे पोलिस प्रशासनाला निवेदन देताना डॉ. प्रसाद ढूस, डॉ. प्रताप गिरगुणे, डॉ. प्रवीणकुमार कोरडे, डॉ. प्रमोद निशिगंध व इतर

राहुरीत डॉक्टरांचे आंदोलन
एक दिवस वैद्यकीय सेवा बंद

राहुरी, ता. ५ : बीएचएमएस-सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात राहुरी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी मंगळवारी (ता.४) दवाखाने एक दिवस बंद ठेवून राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंद आंदोलनात भाग घेतला. डॉक्टर्स संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
इंडियन मेडिकल असोसिएशन, एमएआरडी, एएसएमआय, तसेच विविध विशेषज्ञ वैद्यकीय संघटनांतर्फे राज्यव्यापी वैद्यकीय सेवाबंद आंदोलन पुकारण्यात आले होते.

आंदोलनात प्रमोद निशिगंध, प्रसाद ढूस, मुकुंद शिरसाट, कौशिक मेळावणे, बाबासाहेब वालझडे, महेश वर्पे, प्रताप गिरगुणे, प्रवीण क्षीरसागर, अशोक कुसळकर, प्रवीणकुमार कोरडे, राजेंद्र नेहे, मनीषा ढूस, दीप्ती भंडारी, संदीप म्हस्के, कृष्णा बाचकर, आशिष पाटील आदींनी भाग घेतला.

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे निवेदनानुसार बीएचएमएस-सीसीएमपी डॉक्टरांना नोंदणी देण्याचा प्रस्ताव आधुनिक वैद्यकशास्त्राच्या वैज्ञानिक आणि नैतिक निकषांवर परिणाम करणारा ठरू शकतो. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या संदर्भात शासनाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भूमिका मांडण्यात आली. मात्र, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे आयएमएने स्पष्ट केले आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळी ६ ते बुधवारी (ता. ५) सकाळी सहा वाजेपर्यंत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. भविष्यात नोंदणी प्रक्रिया पुढे सुरू राहिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com