राहुरीत तनपुरेंचे वर्चस्व

राहुरीत तनपुरेंचे वर्चस्व
Published on

राहुरी तालुका
...
१०९ पैकी ७३ मतदार तनपुरे गटाचे

राहुरी : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून मागील सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे बिनविरोध विजयी झाले आहेत. यंदाच्या मतदार यादीत त्यांचे नाव नाही; परंतु १०९ पैकी ७३ मतदार तनपुरे गटाचे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत आमदार प्राजक्त तनपुरे किंवा त्यांचे बंधू हर्ष तनपुरे यापैकी एकाची उमेदवारी आणि विजय निश्चित मानला जात आहे.
राहुरी तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे, ज्येष्ठ नेते ॲड. सुभाष पाटील, शशिकला सुभाष पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे, प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक सुरेश वाबळे अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत.
बिगरशेती संस्थांच्या मतदारसंघात माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, साई आदर्शचे संस्थापक शिवाजी कपाळे, आदर्श पतसंस्थेचे अण्णासाहेब चोथे, नामदेव ढोकणे, आसाराम ढूस, युवराज सुधाकर तनपुरे, सुजाता अरुण तनपुरे, सागर तनपुरे, तानाजी धसाळ, श्यामराव निमसे, सुरेश वाबळे, विलास शिरसाठ आदींची नावे आहेत.
शेतीपूरक मतदारसंघात उषाताई प्रसाद तनपुरे, सुरेश करपे, नामदेव ढोकणे, युवराज तनपुरे, उदयसिंह पाटील, विराज धसाळ, प्रिया चंद्रशेखर पाटील आदींची नावे आहेत.
यापैकी सेवा संस्था मतदारसंघात मागील दोन पंचवार्षिक प्रमाणे यंदाही बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहते की, तनपुरे विरोधात निवडणूक लढविण्यासाठी कोणी उभे राहते, तसेच अन्य मतदारसंघातून राहुरीला उमेदवारी मिळाल्यास कोणाची वर्णी लागते, याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com