माओवादी संबंध प्रकरणी प्राध्यापक हनी बाबू यांच्या घरी छापा

 Professor Honey Babu In the case of Maoist relations
Professor Honey Babu In the case of Maoist relations

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या नोएडा येथील घरी मंगळवारी छापा मारला. पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्यामध्ये गोपनीय कागदपत्रांसह इलेक्‍ट्रॉनिक साधने जप्त केल्याची माहिती पुणे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली. 

छाप्याचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. डॉ. हनी यांना पुणे पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे तपासणीसह पंचनाम्याची सर्व माहिती देण्यात आली. त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांसह इलेक्‍ट्रॉनिक साहित्यातून एल्गार परिषद प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

या प्रकरणात सध्या अॅड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन, सुधीर ढवळे, व्हर्णन गोन्सालवीस, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, पी वरवरा राव, महेश राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहे. 5 सप्टेंबरला त्यांचा डिफॉल्ट जामीन फेटाळण्यात आला. तर समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि आनंद तेलतुंबडे यांना अटक करण्यात आली होती. सध्या खटला सुरू असलेला खटला चालविण्याचे अधिकार या न्यायालयाला नाही.

रोमीला थापर यांची केस तथ्यावर आधारित होती. तथ्याबद्दल येथे वाद नाही. येथे वादाचा मुद्दा कायदा काय म्हणतो हा आहे. या प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी (एनआयए) ने कोणत्याही प्रकारचा तपास केला नाही. त्यामुळे एनआयए कायद्यावर भाष्य न करणेच योग्य असल्याचा बचाव करण्यात आला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com