Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

रायगड जिल्ह्यात ३५१ शिक्षक भरतीनंतरही उरण, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर व सुधागड तालुके भरती प्रक्रियेतून वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर
351 teachers recruited in Raigad, but six talukas remain without new appointments.

351 teachers recruited in Raigad, but six talukas remain without new appointments.

Sakal

Updated on

पाली : रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे ३५१ उपशिक्षक पदांची भरती प्रक्रिया मागील आठवड्यात राबवण्यात आली. यामध्ये मराठी माध्यमाचे ३४० आणि उर्दू माध्यमाचे ११ शिक्षक मिळाले आहेत. या भरतीमुळे काही भागांत दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि सुधागड या सहा तालुक्यांना या प्रक्रियेत पूर्णपणे वगळण्यात आल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. शिवाय या ठिकाणी शून्य शिक्षकी शाळांना देखील शिक्षण देण्यात आलेले नाही. 

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com