पुणे : रेल्वेत विनातिकीट प्रवास करताय? तर हे वाचाच!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

- मध्य रेल्वेच्या पुणे विभागात कारवाई 

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात नऊ महिन्यांत तब्बल सव्वा लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी 17 लाख रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज; तसेच मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात एकूण 2 लाख 76 हजार प्रकरणांत 14 कोटी 39 लाख दंड वसूल करण्यात आला. जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे आदी प्रकरणांचाही त्यात समावेश आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत दोन लाख 50 प्रकरणांमध्ये 12 कोटी 20 लाख रुपयांची दंडवसुली झाली होती. त्यात एक लाख 13 हजार विनातिकीट प्रवाशांकडून सुमारे 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तिकीट तपासणी पथकांनी ही कारवाई केली, अशी माहिती पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. 

कारवाई करण्यात आलेले मार्ग

पुणे-मळवली 
पुणे-बारामती 
पुणे-मिरज 
मिरज-कोल्हापूर 

एकूण प्रकरणे : 2 लाख 76 
दंड वसूल : 14 कोटी 39 लाख रुपये 

मागील वर्षीची प्रकरणे

एकूण : एक लाख 13 हजार 
दंड वसूल : 6 कोटी 24 लाख रूपये 

फसवणुकीचे प्रकार

- जवळच्या मार्गाचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे. 
- साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे 
तिकीट न काढता प्रवास करणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway Administration fine to Passengers who not pay for Travel