esakal | पुणे : 'साहेबांना भेटायचंय, अँटिजेन चाचणी करा!'
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : 'साहेबांना भेटायचंय, अँटिजेन टेस्ट करा!'

पुणे : 'साहेबांना भेटायचंय, अँटिजेन टेस्ट करा!'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रेल्वेचे मोठे साहेब येणार, कर्मचाऱ्यांना भेटणार म्हणून पुणे रेल्वे स्थानकांवर मोठी तयारी करण्यात आली आहे. पण, साहेबांना ज्यांना भेटायचं आहे, अशा ४०-५० जणांना अँटिजेन चाचणी करावी लागली. अन् त्यानंतरच साहेबांनी त्यांना भेट दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक किती सतर्कता बाळगत आहे, हे या घटनेतून दिसून आलं. मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक सी. आलोक कन्सल हे शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले. त्यांच्या भेटीचा कार्यक्रम पुणे रेल्वे प्रशासनाने तयार केला. परंतु, महाव्यवस्थापक कार्यालयाकडून एक सूचना आली. ज्यांना साहेबांना भेटायचं आहे, त्या सगळ्यांची अँटिजेन चाचणी करणे बंधनकारक असेल. चाचणी केलेली नसेल तर, साहेब त्या व्यक्तीला साहेब भेटणार नाही, असं बजावण्यात आलं. ज्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत, त्यांना चाचणीतून वगळण्यात आले. पण, डोस झाल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगण्यास सांगण्यात आलं. पल्स ऑक्झिमीटर, थर्मल गन, सॅनिटायझर यांचीही पुरेशी तजवीज करण्याचीही सूचना आली.

हेही वाचा: उद्योगांना ऑक्सिजन पुरविण्यास केंद्राची परवानगी; राज्याची आडकाठी

कन्सल साहेबांबरोबर येणारे अधिकारी, सोबत असणारे कर्मचारी, त्यांना भेटणारे चार रेल्वे संघटनांचे आठ प्रतिनिधी, स्थानकावरील अधिकारी आदींना अँटिजेन चाचणी करून अहवाल सोबत ठेवावा लागला. साहेब शनिवारी सकाळी लोणावळ्याला आले. तिथून इन्स्पेक्शन ट्रेनने स्थानकांचे निरीक्षण करत पुण्यात आले. घोरपडीला लोकोशेडला त्यांनी भेट दिली. नंतर डिआरएम ऑफिसमध्ये पोचले. उपस्थित अधिकाऱ्यांची चर्चा केली. या वेळी प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून रेल्वे प्रवासी ग्रूपच्या हर्षा शहा यांना भेटण्यासाठी साहेबांनी वेळी दिली. त्यावेळी शहा यांनी, ‘पुणे- मुंबई, सोलापूर, कोल्हापूर दरम्यानच्या इंटरसिटी रेल्वेगाड्या सुरू करा, लोणावळा लोकल प्रवाशांसाठी खुली करा, पुणे- मुंबई मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करा,’ आदी मागण्या केल्या. त्यावर विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन साहेबांनी दिले आणि पुण्यातून चारच्या सुमारास ते रवाना झाले. या बाबत पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी सर्वांना ॲटिजेन चाचण्या करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी चाचण्या केल्या. नेहमीच्या पद्धतीने त्यांनी रेल्वेच्या प्रकल्प, उपक्रमांची माहिती घेतली.’’

loading image
go to top