रेल्वे रुग्णालयामध्ये डायलिसिसची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे रुग्णालयामध्ये किडनीच्या रुग्णांसाठी डायलिसिसची सुविधा सुरू केली आहे. कोथरूड डायलिसिस सेंटर आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या करारानुसार शनिवारी (ता. १) ही सेवा रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या कराराअंतर्गत रुग्णालयामध्ये तीन डायलिसिसच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत.

ही सेवा पुढील तीन वर्षे सुरू राहणार आहे. या सुविधेचा लाभ रेल्वेचे ५० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक यांना होणार आहे. या करारामुळे रेल्वे प्रशासनाची वर्षाला २२ लाख रुपयांची बचत होणार आहे.

या वेळी देऊस्कर म्हणाले, ‘‘रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.’’

या कार्यक्रमप्रसंगी कोथरूड डायलिसिस सेंटरचे संचालक व किडनी रोगतज्ज्ञ डॉ. अभय सदरे, रेल्वेचे मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ. एम. के. रामाकृष्णा, अपर व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा आदी उपस्थित होते.

Web Title: Railway Hospital Kidney Patient Dialysis Facility