‘सिग्नल’ मिळूनही रेल्वे संग्रहालय रखडले

‘सिग्नल’ मिळूनही रेल्वे संग्रहालय रखडले

लोणावळा - लोणावळ्यातील प्रस्तावित रेल्वे संग्रहालय अद्यापही कागदोपत्रीच आहे. मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले लोणावळा स्थानक देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ मानले जाते. हे काम लवकरात लवकर केव्हा पूर्ण होणार, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

लोणावळा हे ‘अ’ वर्ग स्थानक आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या वतीने स्थानक व परिसराचा कायापालट करत ते जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोणावळा व खंडाळ्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लाखोंच्या घरात असते. सुरुवातीस रेल्वे संग्रहालय पुण्यात प्रस्तावित होते. मात्र, पुरेशा जागेअभावी तसेच लोकप्रिय पर्यटनस्थळ असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लोणावळ्याची निवड करण्यात आली. रेल्वेच्या वतीने लोणावळ्यात जागतिक दर्जाच्या रेल्वे संग्रहालयाच्या प्रस्तावाला मान्यता देत सन २००८ मध्ये रेल्वेने संग्रहालयासाठी संकल्पना आराखडा तयार करण्यासाठी खासगी सल्लागार नेमण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही.

११.६३ कोटी खर्चास मंजुरी
लोणावळा रेल्वे स्थानकालगतच रेल्वेच्या मालकीचे जवळपास २१ एकर क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे. रेल्वेच्या पिंक बुकमध्ये रेल्वे संग्रहालयाची नोंद करत सन २००८-०९ मध्ये रेल्वे संग्रहालयासाठी ११ कोटी ६३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. लोणावळ्यात रेल्वे संग्रहालय व्हावे, यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ नायडू प्रयत्नशील आहेत. नायडू यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासह विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन प्रतिसादामुळे संग्रहालयाचे काम पुढे सरकत नसल्याची खंत नायडू व्यक्त करतात. हे संग्रहालय लवकरात लवकर झाल्यास पर्यटनात मोठी वाढ होईल, असे नायडू यांनी आवर्जून सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com