Manchar Railway
sakal
मंचर - गेल्या तीन दशकांपासून पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचे आश्वासन ऐकत असलेल्या आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यातील नागरिकांना शुक्रवारी (ता.१५) एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. मंचर बाह्य वळण मार्गावरून रेल्वेचे डबे घेऊन जाणारा कंटेनर दिसताच परिसरात एकच चर्चा रंगली व पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.