मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! - ११ स्टोअर सुरू; आणखी चार स्थानकांवर लवकरच सुविधा (Word Count : 317 CC : 21.54 Page Baskets: - Locations: -) मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर

मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! - ११ स्टोअर सुरू; आणखी चार स्थानकांवर लवकरच सुविधा   (Word Count : 317   CC : 21.54  Page Baskets: -  Locations: -)

मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर
Published on: 

रेल्वेच्या स्थानकांवर
किराणा स्टोअर

११ ठिकाणी सुरू; चार स्थानकांवर लवकरच सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : लोकल अन् लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकांवरच किराणा सामानासह दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ११ स्थानकांवर सध्या किराणा स्टोअर सुरू आहेत. आणखी चार स्थानकांवर लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. कुर्ला स्थानकावर सर्वाधिक चार स्टोअर आहे. या सुविधेच्या विस्तारामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक वस्तू खरेदी करणे अधिक सोयीचे होणार आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर चार, कल्याण येथे दोन, तर दादर, भायखळा, कांजूरमार्ग, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि वाशिंद येथे प्रत्येकी एक किराणा स्टोअर सुरू आहे. लवकरच विद्याविहार, कसारा, बदलापूर आणि दिवा या स्थानकांवर प्रत्येकी एक स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. या स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंची यादी निश्चित केली आहे. त्यानुसार तांदूळ, गहू, डाळी, खाद्यतेल, साखर, मीठ, मसाले आणि सुकामेवा यांसारख्या किराणा वस्तू विकता येतील. याशिवाय बिस्किटे, चिप्स, पॉपकॉर्न, इन्स्टंट नूडल्स, जॅम, लोणची, सॉस, बाटलीबंद पिण्याचे पाणी, फळांचे रस आणि शीतपेयांचाही समावेश आहे. दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, पराठे, कटलेट, नगेट्स यांसारखे शिजवण्यापूर्वी तयार ठेवलेले पदार्थ आणि आइस्क्रीमही विकता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com