
मंचर : सातगाव पठार (ता.आंबेगाव) येथे मे महिन्यात जोरदार वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे वेळ नदीवर असलेले दहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. तळ गाठलेल्या ६०० हून अधिक विहिरींना दहा फुटापर्यंत पाणी आले. नदीकाठच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. बंद पडलेल्या कुपनलिकेला पाणी आले. पण या भागातील पिण्याच्या पाण्याचे टँकर मात्र अजूनही सुरु आहेत. पाण्याच्या टँकरबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.