Pune Rain Water
sakal
पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांना झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (ता. ७) काहीसा ओसरला. पावसाने उघडीप दिल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. पुढील दोन ते तीन दिवस शहरात पावसाचा जोर आणखी कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. मात्र, जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) अंदाज कायम आहे.