पुण्यात धरण क्षेत्रात किती पाऊस?; वाचा सविस्तर बातमी

पुण्यात धरण क्षेत्रात किती पाऊस?; वाचा सविस्तर बातमी

टेमघरला 184, मोळेश्वर कण्हेर 175 मिलिमीटर पाऊस 

खडकवासला -  चक्री वादळाच्या वाऱ्यामुळे भीमा खोऱ्यात टेमघर येथे 184 तर कृष्णा खोऱ्यातील मोळेश्वर कण्हेर येथे 175 असा सर्वाधिक पाऊस पडला आहे. 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर ठिकाणी मंगळवार पासून पाऊस पडत आहे. आज सकाळ पासून खडकवासला येथे ३७ पानशेत वरसगाव येथे ९२, टेमघर १७१मिलीमीटर  पाऊस पडला आहे. टेमघर येथे पडलेल्या पावसामुळे धरणातील पाण्यात किरकोळ वाढ होणार आहे. असे शाखा अभियंता राजकुमार क्षीरसागर यांनी सांगितले.

भीमा खोऱ्यातील पानशेत धरणातील शिरकोली येथे 115, लवासा दासवे येथे 152, वेल्हे गुंजवणी धरणाजवळच्या घीसर 129, वेल्हे 86, भट्टी वाघदरा 113,
भाटघर धरणातील भुतोंडे १००, पिंगारी 84, शिरगाव, 98 नीरा-देवघर 101, हिरडोशी 91, कासारसाई 46, आंबेघर 42,  कुंभेरी 119, सवाळे मावळ 65, नाझरे सासवड 22, पवना 56,  खिरेश्वर जुन्नर 55, राजापूर डिंभे 69, डिंभे आंबेगाव78, पिंपळगाव जोगा मढ 72, भामा आसखेड 102 मिलिमीटर पाऊस पडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कृष्णा खोऱ्यातील सातारा जिल्ह्यातील जोर जुने महाबळेश्वर 163, महाबळेश्वर 158, रांजणी 142, मोळेश्वर कण्हेर 171, कोयनानगर 136, प्रतापगड 103, उरमोडी कास 120, धोम बलकवडी धरण 94, जांभळी धोम 136, वळवण 96, उरमोडी सांडवली 117, तारळे पाटण 63, बेलवडे पाटण76, येळगाव कराड 42, नागेवाडी वाई 81, ठोसेघर 89, उरमोडी66, नवजा 111, कोयनानगर 136, निवळे 97,  चाफळ 103, कादवी धरण 67 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

सांगली जिल्ह्यातील वारणा (आरबीसी) 71मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर शाहूवाडी कसारी 129, रेवाचिवाडी 106, गगनबावडा 116, कुंभी धरण 80, दाजीपूर राधानगरी 60, तुळशी पडसाली 48 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com