Pune Rain : गणरायाच्या आगमनासोबत पावसाचेही पुनरागमन

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पुन्हा हजेरी लावली.
ganeshotsav Rain

ganeshotsav Rain

sakal

Updated on

पुणे - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पुन्हा हजेरी लावली. सोमवारी (ता. १४) सकाळपासून शहरावर ढगांची दाटी होती. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा वाढला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला. मात्र पावसाची रिपरिप सुरू असतानाही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com