पुणेकरांचा विकेंड ओला चिंब!

Rainfall on saturday in pune spoil weekend of pune people
Rainfall on saturday in pune spoil weekend of pune people

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप घेतली होती. मात्र आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मीती झाली होती. बघता बघता दूपारनंतर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे आता पुणेकरांचा विकेंड हा ओलाचिंब झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी शहरात सकाळपासूनच उन सावलीचा खेळ सुरू होता. परंतू दुपारपर्यंत ढग भरून आले आणि पावसाने पुन्हा एकदा शहरात हजेरी लावली. काही ठिकाणी मेघगर्जनांसह रिपरिप सुरू झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला व उकाड्यापासून लोकांची काही काळासाठी सुटकाही झाली.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काही भागांमध्ये रस्त्यावरील पाणी साठले. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी पावसापासून सुटकेसाठी स्टॉपच्या शेडचा आधार घेतला. दरम्यान पुढील तीन चार दिवस शहरात हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना आता छत्री, रेनकोट घेऊन जाने गरजेचे असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com