उच्च शिक्षण संस्थांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहीम

Rainwater-harvesting
Rainwater-harvesting

पुणे - पावसाच्या पाण्याचे संचयन करून पाण्याची बचत होण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘कॅच द रेन’ ही पर्जन्यजल पुनर्भरण मोहीम (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबवली जाणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आदेश दिले आहेत. 

पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून, समान वाटप होण्यासाठी राष्ट्रीय जल धोरणाने ‘कॅच द रेन’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यात पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते साठवून ठेवणे किंवा जमिनीत मुरणे आवश्‍यक आहे. 

यासाठी देशातील विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी ‘कॅच द रेन’ या मोहिमेची अंमलबजावणी करावी. उच्च शिक्षण संस्थांनी पावसाचे पाणी जमिनीत जाण्यासाठी पर्जन्यजल पुनर्भरण यंत्रणा बसवून घ्यावी. त्याशिवाय जलसाठा वाढवण्यासाठी टाक्‍यांची स्वच्छता, पाणी साठण्याच्या मार्गात काही अतिक्रमणे असल्यास ती काढून टाकणे आदी उपक्रम राबवावेत, असेही यूजीसीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

दरम्यान, या कामात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा असे नमूद केले आहे. मात्र, लॉकडाउनमुळे शिक्षण संस्था बंद असल्याने विद्यार्थी नसताना याची अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न संस्थांना पडला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com