
पुणे : शहरात पावसाळ्यामुळे कॉलरा, अतिसार (डायरिया), टायफॉइड व काविळीचे रुग्ण वाढले आहेत. सोबतच उघड्या जखमेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या लेप्टोस्पायरोसिससारख्या जिवाणूजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना शुद्ध व उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला आहे.