esakal | राज ठाकरेंनी सांगितला फडणवीस आडनावाचा अर्थ
sakal

बोलून बातमी शोधा

Raj-Thackeray

मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल राज ठाकरे यांनी सांगितलं.

राज ठाकरेंनी सांगितला फडणवीस आडनावाचा अर्थ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाबासाहेबांवर टीका करणाऱ्यांनी स्वत: काही वाचलं नाही. जे ऐकायला मिळतंय त्यातून फक्त राजकारणासाठी आरोप केले असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. आजच्या परिस्थितीत महाराज काय सांगतात ते बाबासाहेब आपल्याला सांगत आलेत. आज एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेसोबत ते एक ऐतिहासिक संदर्भ सांगत असतात. ते सांगायचं काम करतात आपण जाणून घ्यायचं काम करायचं असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल राज ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, प्रत्येक भेटीवेळी ते नवीन सांगत असतात. एक शंका त्यांना विचारली होती. निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारू किंवा इतर काही शब्द असे आहेत की जी तेव्हाची मराठी आहे. अनेकदा शब्द तेच असतात फक्त त्यात ळ आणि ल मधे जसे असतात तसे काही फरक आहेत. आपण कैसी च्या जागी कैंची असं लिहलेलं आहे यासंदर्भात त्यांच्याशी बोललो.

हेही वाचा: भाजपच्या कामाची पोलखोल करा - राज ठाकरे

फडणवीस आडनावाचा अर्थ

मराठी भाषेत असलेल्या इतर भाषांमधील ठिकाणांचे शब्द आणि त्याचे अर्थ याबद्दल बोलताना त्यांनी फडणवीस आडनावाबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आजही अनेक फारसी शब्द आहेत जे आपण वापरतो. काही अडनावं अशी आहेत ती कुठून आली, त्याचे अर्थ काय याची माहिती नाही. आत फडणवीस आडनाव, तर फडणवीस हे आडनाव नाही. ते एक पर्शियन नाव फर्दनवीस आहे. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा. नंतर फडावरती लिहणारा म्हणून ते फडणवीस झालं असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

परप्रांतियांबाबत भूमिका स्पष्टच

फडणवीस म्हणाले होते की, राज ठाकरेंनी परप्रांतियांबाबत भूमिका स्पष्ट केली तर आम्ही विचार करू. यावर फडणवीस यांनी उत्तर देताना माझी भूमिका स्पष्टच असल्याचं सांगत फडणवीस यांच्या वक्तव्यातली हवा काढून टाकली. तसंच भाजप मनसे युतीच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, असे प्रश्न माध्यमांकडूनच विचारले जातात आणि त्याच्या उत्तरावर चर्चा केली जाते. उत्तर भारतीयांसाठी केलेल्या भाषणाची क्लिप मी चंद्रकांत पाटील यांना पाठवलेली नाही असंही त्यांनी सांगितलं.

loading image
go to top