
100 पुरोहित, मंत्रांचं पठण आणि ठाकरेंच्या हिंदुत्वाचा थाट
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दोऱ्याची चर्चा सध्या सर्वत्र आहे. ठाकरेंची मोठी सभा औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. यासाठी ठाकरे मुंबईतून पुण्यात आले. पुण्यात १०० पुरोहितांच्या उपस्थितीत मंत्र पठण करण्यात आलं. ठाकरेंच्या गाडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. (Raj Thackeray in Pune)
त्यांच्या पुढील कार्यासाठी यश मिळो यासाठी गुरुजींनी पूजा केली. राज ठाकरे यांच्या पुण्यातील घराबाहेर हे विधी संपन्न झाले आहेत. दरम्यान वाढू येथे राज ठाकरे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे आशीर्वाद घेणार आहेत. (Raj Thackeray News)
हेही वाचा: इफ्तार पार्टीला या ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची १ मे रोजी म्हणजे रविवारी सभा घेणार आहेत. यासाठी अखेर पोलिसांनी परवानगी देखील दिली. अनेक राजकीय संघटनांनी सभेला विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही या विरोध नोंदवला आहे. राज यांच्या सभेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
Web Title: Raj Thackeray Leaves To Aurangabad After Hindu Rituals In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..