Raj Thackeray : दुर्धर आजाराने आजारी असलेल्या राजला भेटले राज ठाकरे

दापोडीतील मनसे कार्यकर्त्याचा मुलगा राज देशपांडे याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Raj Deshpande and Raj Thackeray
Raj Deshpande and Raj Thackeraysakal

जुनी सांगवी - दापोडी येथील मनसेचे कार्यकर्ते विशाल देशपांडे यांचा मुलगा राज देशपांडे यास दुर्धर आजाराने ग्रासले आहे. वडील मनसेच्या स्थापने आधी पासून राज ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. राज देशपांडे याने राज साहेबांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली होती. ही माहीती तात्काळ शहरातील पदाधिकाऱ्यांनी लाडक्या नेत्याकडे कळवली, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दापोडी येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणाऱ्या देशपांडे कुटूंबाची व राज देशपांडे याची बुधवार ता. २३ सकाळी अकरा वाजता भेट घेऊन त्याला दिलासा दिला.

दापोडीतील एका सोसायटीत राहणारा अत्यंत सर्व सामान्य कार्यकर्ता विशाल देशपांडे मनसेच्या स्थापनेपासून हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. देशपांडे किर्लोस्कर ऑईलमध्ये नोकरीस होते. पण नोकरी गेली आणि रिक्षा चालवायला लागला. त्यातच वडिलांचे आजारपण वाढले. आणि त्यांच्या सेवा श्रुषा करण्यात विशालची घरची आर्थिक परिस्थिती खालावली.

सार्वजनिक कार्याची आवड असूनही घरच्या जबाबदाऱ्यांनी पिचल्याने मनसे परिवारातील अनेकांनी मदतीचा हात दिला. संकटे आली की ती एका मागोमाग येत परिक्षा घेत राहतात. एकीकडे वडिलांचे आजारपण सांभाळताना दुसरीकडे विशालच्या लाडक्या मुलाला तीन महिन्यांपूर्वी दुर्धर आजाराने गाठले. विशेष म्हणजे राज ठाकरेंवर इतके प्रेम की विशाल यांनी आपल्या मुलाचे नाव सुद्धा राज साहेबांच्या नावावरून राज ठेवले.

Raj Deshpande
Raj Deshpandesakal

शाळेत शिकणाऱ्या राज देशपांडेंचे आजारपण वाढत गेले. शरीरातील मसल कमजोर होत जाणाऱ्या मस्क्युलर डिस्कोलेट या आजारावर उपचार हाताबाहेर गेलेले. उपचार फक्त अमेरिकेत आणि त्यासाठीचा खर्च जवळपास सोळा ते सतरा कोटींचा. त्यामुळे विशाल देशपांडे यांनी आशा सोडून दिली. मात्र अशातही त्यांच्या चिरंजीवाने एक हट्ट धरला आणि तो म्हणजे राज ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त केली.

मनसेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांच्या कानावर हे सगळं गेलं. त्यांनी राज साहेबांपर्यंत तो निरोप पोहचवला. क्षणाचाही विलंब न लावता राज ठाकरे यांनी होकार दिला. बुधवारी सकाळी ११ वाजता स्वतः राज ठाकरे देशपांडे यांच्या घरी भेट देण्यासाठी आले. यावेळी विशाल देशपांडे म्हणाले आयुष्याचे सार्थक झाले. साक्षात विठ्ठलाचे पाय माझ्या घरी आले. मी धन्य झालो. असे विशाल देशपांडे यांनी याप्रसंगी उद्गार काढले.

नेत्याची कार्यकर्त्या प्रती असलेले नाते व तळमळ राज ठाकरे यांच्या भेटीने दापोडी करांनी अनुभवली.

परमेश्वराची इच्छा असेल तर नक्कीच राज ठाकरे यांच्या येण्यामुळे चमत्कार घडून येईल

राज देशपांडे याची भेट घेत. राज ठाकरे यांनी त्याच्याशी संवाद साधला. तर राज याने परिधान केलेल्या कुडत्यावर त्यांनी स्वतःची स्वाक्षरी देऊन त्याची ईच्छा पूर्ण केली. सोबत आणलेल्या भेट वस्तूही राजला दिल्या.

दरम्यान राजचे वडील विशाल देशपांडे यांच्याकडून राजच्या आजाराबाबत माहिती घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत या संबंधित डॉक्टरांची भेट घेऊन प्रथम त्याची तपासणी करून घेऊ. त्यानंतर ठरवू काय करायचे ते. असे आश्वासन दिले. शहरातील मनसेच्या पदाधिका-यांसह दापोडीत राज ठाकरे येणार असल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com