'मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे'; पदावरुन काढल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'मी तर कधीपासूनच तुझाच मावळा'; पदावरुन काढल्यानंतर वसंत मोरेंची पोस्ट

'मी तर कधीपासूनच तुझाच मावळा'; पदावरुन काढल्यानंतर वसंत मोरेंची पोस्ट

पुणे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावा असे आदेश दिलेले असताना त्यास विरोध करणे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना भोवले आहे. या पदावर हकालपट्टी करून माजी नगरसेवक व गटनेते साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, वसंत मोरेंनी फेसबुकवरून बाबर यांचे अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा: ना'राज' वसंत मोरेंनी सोडला व्हॉट्सअप ग्रुप; पक्षाकडून मुंबईला बोलावणं नाही

वसंत मोरेंनी फेसबुकवर पोस्ट टाकत म्हटलंय की, "आरे मी तर कधी पासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड खुप खुप अभिनंदन साई..."

वसंत मोरे यावेळी म्हणाले की, गेल्या ३ दिवसांपासून मी नाराज नाही असं सांगतो आहे. माझी भूमिका ही लोकप्रतिनिधी म्हणून होती. शहर अध्यक्ष हा पक्षाचा असतो आणि नगरसेवक हा लोकांचा असतो. मी राज ठाकरेंना शहराध्यक्ष पदाबद्दल सांगितले होते. मी मे महिन्यापर्यंत अध्यक्ष राहील त्यानंतर दुसऱ्याला ही जबाबदारी द्या असं मी त्यांना सांगितलं होतं. मी पक्षावर आणि राज साहेबांनवर खोटं प्रेम केलं नाही. जे पोटात आहे, ते डोक्यात आहे आणि तेच ओठांवर आहे. मी पक्षासोबत राहील, तसेच मला कोणाच्या ही पाठिंब्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतलेल्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढले नाही तर त्याला प्रत्युत्तर म्हणून स्पीकरवरून हनुमान चालीसा लावा आदेश दिले आहेत. त्याचे पडसाद राज्यातील विविध शहरात उमटत असून मनसे कार्यकर्त्यांकडून स्पीकर लावून हनुमान चालीसा ऐकवली जात आहे. त्यावरून राजकारण सुरू झाले आहे.

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार भोंगे लावण्यास नकार दिला. राज ठाकरे यांना शासनाकडून भोंगे काढण्याची कारवाई होणे अपेक्षित आहे, जर काढले नाहीत तर त्यास हनुमान चालीसा द्वारे प्रत्युत्तर द्या असे त्यांचे म्हणणे आहे. माझ्या प्रभागात मुस्लीम मतदार आहेत. त्यांच्याकडून तुम्ही काय भूमिका घेणार असे मला विचारले जात आहे. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी अडचणीचा ठरत असल्याने माझ्या भागात मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधात भोंगे लावली जाणार नाहीत, अशी भूमिका वसंत मोरे यांनी जाहीर केली त्यावरून पक्षाच्या शहराध्यक्ष मॅच थेट राज ठाकरे यांच्या भूमिकेला आव्हान दिल्याने खळबळ उडाली मोरे यांच्या भूमिकेवर पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी टीका करत पक्षामध्ये वैयक्तिक भूमिका थारा नाही असे सांगितले.

हेही वाचा: Kothrud; दादा परत या! पुण्यात झळकलेल्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधान

वसंत मोरे यांच्या भूमिकेमुळे ते पक्ष सोडणार अशा चर्चेला उधाण आले, त्यावर मोरे यांनी वॉट्सॲप स्टेटसवर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो ठेवून मी आपला इथेच बरा असे सांगत मनसे सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. आणि पार्ट टाइम राजकारण करणाऱ्यांनी मला पक्ष निष्ठा शिकू नये. कालपासून मला सर्वच पक्षाच्या आॅफर आल्या आहेत, पण मी कोणाकडेही जाणार नाही. मी मनसेच काम करणार आहे. असे स्पष्ट केले होते.

मात्र त्यानंतर वसंत गोर्हे ना सकाळी नसे पदाधिकार्‍यांच्या ग्रुपमधून बाहेर पडले त्यानंतर अवघ्या काही वेळात मनसेचे प्रमुख पदाधिकारी मुंबई येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदावर निवड करून वसंत मोरे यांना त्या पदावरून दूर केले आहे

Web Title: Raj Thackeray Mns Pune Vasant More First Reaction After Being Removed From Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..