
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून राज्यात शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
राज ठाकरे यांना अटक करावी - प्रवीण गायकवाड
पुणे - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून राज्यात शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. राज ठाकरे हे जातीयवादी राजकारण करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जाहीर सभेतील भाषणानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या संदर्भात गायकवाड म्हणाले, ‘राज ठाकरे हे खोटा इतिहास सांगून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. राज्यात फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या व्यक्तीस बहुजनवादी म्हणतात, जातीयवादी नाही. तर, हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जातीयवादी म्हणतात आणि ते राज ठाकरे आहेत. राज्यात अस्वस्थता पसरली असून, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ते राज्यघटनेच्या धोरणाविरुद्ध वक्तव्य करीत आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना अटक करून समज देण्यात यावी.’
Web Title: Raj Thackeray Should Be Arrested Praveen Gaikwad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..