Vidhan Sabha 2019 : पुण्यात राज यांची पुन्हा सभा; कसबा गणपतीचे घेतले दर्शन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभा पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज (गुरुवार) सकाळी राज यांनी कसबा गणपतीची आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर काही वेळातच ते मुंबईला रवाना झाले. यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे, कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अजय शिंदे, मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईडी चौकशी राज काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. कारण तेव्हापासून ते शांत होते. राज यांची आज मुंबईत जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मनसेचा प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. ते भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल करणार असल्याची चर्चा आहे. 

काल पावसामुळे सभा रद्द झाल्याने ती सभा सोमवारी होईल, अशी माहिती अजय शिंदे यांनी दिली आहे. ''सोमवारी सभेसाठी मैदान न मिळाल्यास, राज ठाकरे रस्त्यावर सभा करणार असल्याचेही अजय शिंदे यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray will return in pune for rally of MNS Campaign in Maharashtra Vidhansabha 2019