Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ'

विनायक बेदरकर
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटलेले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कोथरूडमध्ये दाखल होत आहे.

कोथरूड (पुणे) : कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सर्व विरोधक एकवटलेले असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी कोथरूडमध्ये दाखल होत आहे.

कोथरूड भागातील भेलके नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोथरूड मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मंगळवारपासूनच राज ठाकरे प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. बुधवारी पुणे शहरामध्ये राज ठाकरे त्यांच्या दोन प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वीच कोथरूडमध्ये ठाकरे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत.

Vidhan Sabha 2019 : संभाजी ब्रिगेडचे स्टार प्रचारक जाहीर!

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधक मनसे उमेदवाराच्या पाठिशी उभे ठाकले असताना राज ठाकरे हे मंगळवारपासूनच कोथरूडच्या प्रचारात उतरून निवडणुकीत रंगत आणणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray will start Election Campaign from 8th October for Maharashtra Vidhan Sabha 2019