छत्रपती मालोजीराजे व लोकशाहीर अमर शेख यांच्या स्मृती इंदापूरकरांनी जतन केल्या पाहिजेत - राजन खान

इंदापूर पंचायत समिती अल्पबचत सभागृहात राष्ट्रशाहीर अमरशेख स्मृती प्रित्यर्थ नीरा भीमा विकास संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ
Rajan Khan statement Indapurkar should preserve the memory of Chhatrapati Maloji Raje and Lokshahir Amar Sheikh
Rajan Khan statement Indapurkar should preserve the memory of Chhatrapati Maloji Raje and Lokshahir Amar Sheikh sakal

इंदापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे तसेच लोकशाहीर अमर शेख यांच्या पद स्पर्शाने पावन इंदापूर नगरीत त्यांच्या स्मृती इंदापूरकरांनी जिवंत ठेवल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांचे यथोचित स्मारक होणे गरजेचे आहे असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले. इंदापूर पंचायत समिती अल्पबचत सभागृहात राष्ट्रशाहीर अमरशेख स्मृती प्रित्यर्थ नीरा भीमा विकास संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. निरा भीमा विकास संस्थेचेअध्यक्ष सलीम शेख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

राजन खान पुढे म्हणाले,संयुक्त महाराष्ट्रचळवळीत अनमोल योगदान देणारे अमर शेख यांचे स्मारक उभारण्यासाठी सलीम शेख व सहकारी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या नियोजित स्मारकामध्ये ग्रंथालय व संशोधन केंद्राचा समावेश करण्यासाठी तमाम इंदापूरकरांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सलीम शेख,नगरसेवक कैलास कदम यांची भाषणे झाली.नादर शेख,रामदास देवकर, अकबर शेख, ज्योती गायकवाड, हनुमंत कांबळे आदींनी काव्यवाचन केले. यावेळी अंकिता मुकुंद शहा (नगराध्यक्षा - इंदापूर),चंद्रकांत घाटगे( भांडुप ),प्रा. डॉ. प्रभाकर पवार ( फलटण ),अनिलचंद्र सामंत (दहिसर ),ॲड.प्रिया शहा (दादर ),चंद्रहास शेजवळ (उंब्रज),डॉ. सचिन गराटे (माहीम),प्रा.विजय कोष्टी(कवठेमहांकाळ ), अनिल जगताप ( धुळे ), ताहेर बकस शेख, शरद झोळ, ज्योती गायकवाड,वीरभद्र तथा महेश स्वामी ( सर्व इंदापूर ) यांना सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रशाहीर अमर शेख पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कवी सुनील साबळे यांनी सूत्रसंचालन केले.

हिंदू मुस्लिम या विसंवादी मानसिकतेमुळे शाहीर म्हणून श्रेष्ठ असणा-या अमर शेख यांना अपेक्षित महत्व मिळाले नाही. देशात २८ टक्के दलित, ८ टक्के आदिवासी, ४० टक्के ओबीसी आहेत. आदिवासी व ओबीसींना मुख्य विकास प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी किंवा प्रस्थापित राजकारण्याकडून मुस्लिमांचा बागूलबुवा केला जात आहे. सत्तर वर्षात हिंदू- मुस्लिम मुद्द्यांवर राजकारण झाले. त्यामुळे मुस्लिमांनी स्वतःला राजकीय प्रक्रियेतून बाजूला करूनशिक्षण व विकासास सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असे मत राजन खान यांनी व्यक्त करताच त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात उस्फुर्त स्वागत झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com