राजस चौकातील कामाचा बीएसएनलच्या ग्राहकांना फटका; १५ दिवस इंटरनेट बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajas Chowk Culvert work BSNL customers facing issue with Phone and internet services katraj

राजस चौकातील कामाचा बीएसएनलच्या ग्राहकांना फटका; १५ दिवस इंटरनेट बंद

कात्रज : राजस चौकात पथ विभागामार्फत ओढ्यावरील कल्व्हर्टचे काम चालू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू असल्याने बीएसएनलची लाईन तुटली आहे. त्यामुळे परिसरातील बीएसएनलच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसला असून जवळपास १५ दिवसांपासून सेवा खंडित झाल्याने याठिकाणचे फोन आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे. नागरिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, बीएसएनएल खात्यांकडून कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणांत बीएसएनलचे ग्राहक असूनही योग्यप्रकारे दखल घेतली जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

कल्व्हर्टचे काम चालू असताना खोदकाम करताना बीएसएनलच्या वाहिन्यांसह बाकी टेलिकॉम कंपन्यांच्या ताराही तुटल्या आहेत. परंतु, त्यांनी तत्काळ काम करुन घेतले असल्याचे पथ विभागांमार्फत सांगण्यात येत आहे. बीएसएनलला खोदकाम करण्यांपूर्वी पूर्वकल्पना दिलेली असतानाही कोणत्याही प्रकारची पूर्व काळजी घेतली नाही. मात्र, आम्ही वाहिन्या जोडण्यासाठी बीएसएनलला कोणतीही मदत लागल्यास ती करण्यास तयार असल्याचे पथविभागाचे कनिष्ठ अतुल कडू यांनी सांगितले आहे.

राजस चौकात जेसीबीने खोदकाम करत असताना वायर तुटल्याने सेवा खंडित झाली आहे. यामध्ये बीएसएनलचा काही दोष नाही. मात्र, आम्ही लवकरच ही सेवा सुरळित करणार आहोत. त्याचबरोबर सेवा खंडित झालेल्या कालावधीत ग्राहकांना शुल्कही आकरण्यात येणार नाही.

- प्रदीप चव्हाण, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, बीएसएनएल

Web Title: Rajas Chowk Culvert Work Bsnl Customers Facing Issue With Phone And Internet Services Katraj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top