वाई:-राजेश भोज यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार. विद्यानिकेतन प्रतिष्ठानचा उपक्रम.
आदर्श शिक्षक पुरस्काराने
राजेश भोज यांचा गौरव
वाई. ता. २३ : येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयातील
मराठी विभाग प्रमुख राजेश भोज यांना विद्यानिकेतन प्रतिष्ठान या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
भोज हे मराठी विषयाचे अध्यापक, बालनाट्य लेखक व सर्वांगी प्रतिष्ठान वाईचे अध्यक्ष असून, अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत कोचळे यांनी सांगितले.
नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक विजय ढेकाने, प्रसाद बनकर, सतीश बनवट व संतोष शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून ३१ पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
----------------------------
07611
वाई : विद्यानिकेतन संस्थेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार संतोष शिंदे यांच्या हस्ते स्वीकारताना राजेश भोज व सोनाली भोज.
--------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

