राजगड तालुका सायबर गुन्हेमुक्तीसाठी जागृती

राजगड तालुका सायबर 
गुन्हेमुक्तीसाठी जागृती
Published on: 

वेल्हे, ता. ३ ः वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुका सायबर गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने वेल्हे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांना सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. २) सकाळी ११ वाजता तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांची बैठक घेण्यात आली. यावेळी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली.
अमृतेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष विलास किरवे यांच्या सौजन्याने सायबर जागृतीसाठी सुमारे १०० बॅनर तयार करण्यात आले आहेत. हे बॅनर तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांना देण्यात आले असून, गावातील दर्शनी भागात लावण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावोगावी सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे.
सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती तसेच वैयक्तिक माहिती देऊ नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com