Rajgad Water Shortage : राजगडच्या पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य; बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

Rajgad Drinking Water Priority and Dam Repair : राजगड तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्ट केले. गुंजवणी धरणावरील नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Rajgad Drinking Water Priority and Dam Repair

Rajgad Drinking Water Priority and Dam Repair

esakal

Updated on: 

राजगड: राजगड तालुक्यातील धरणांमधील पाणी अन्यत्र सोडण्यास अथवा त्याचा वापर करण्यास माझी कोणतीही हरकत नाही.मात्र, शासनाच्या धोरणानुसार सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला, त्यानंतर शेतीला आणि मग औद्योगिक व व्यावसायिक वापराला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे राजगड तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर पहिला हक्क स्थानिक जनतेचाच राहील,अशी ठाम भूमिका आमदार शंकर मांडेकर यांनी मांडली.

Loading content, please wait...

Related Stories